महोत्सव स्थळ


आषाढ शु.१५ श्रीशके १९४६; रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी पुणे केंद्रामध्ये श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव विविध गावांतून, शहरांतून आलेल्या साधक बंधुभगिनींच्या, सद्‌भक्तांच्या आणि दर्शनार्थींच्या अभूतपूर्व सहभागाने अत्यंत आनंदाने, उत्साहाने पार पडला.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

‘श्री दासबोध’ या ग्रंथात समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी सद्‌गुरूंची तेरा लक्षणे सांगितलेली आहेत. ते म्हणतात;

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन । कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ।।  दा.बो.५.२.५२ ।।

पुढे ते असेही म्हणतात की, या तेरांपैकी एकही गुण उणा असून चालणार नाही. ही सर्वच्या सर्व लक्षणे ज्यांच्यापाशी आढळतात तेच सद्‍गुरु   ! आपल्या उज्ज्वल, अलौकिक सद्‍गुरु-परंपरेतील प्रत्येक विभूती या सर्व गुणांनी मंडित आहेतच, शिवाय एक विशेष गुण त्यांच्यात आहे तो म्हणजे ‘अकारण करुणा’   ! या करुणेमुळेच त्यांनी आपल्याला सनाथ केले आहे आणि चुकणाऱ्या स्खलनशील अशा सर्व लेकरांना ते अखंड अनाक्रोश क्षमाच करीत असतात. आई घेईल त्यापेक्षा अधिक काळजी सद्‍गुरु घेत असतात. प्रत्येक साधकाकडे त्यांचे सतत पूर्ण लक्ष असते. प्रत्येक साधक-जीवाला भगवत्प्राप्ती होईपर्यंत त्याचा योग आणि क्षेम वाहण्याचे ब्रीदच त्यांनी उचललेले असते.

अशा ‘करुणामूर्ति, दयाळ’ सद्‍गुरुपरंपरेविषयी आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे सप्रेम स्मरण-पूजन करण्यासाठी, त्यांचे दर्शन घेऊन, वंदन करून क्षमाप्रार्थना करण्यासाठी श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मुंबई केंद्रातील सर्व साधक-सद्‌भक्त एकत्र जमले होते. हा उत्सव रविवार दिनांक २८ जुलै रोजी, दादर येथील ‘सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज सभागृहा’त अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा झाला.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

या वर्षीचा अमेरिकेतील श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव, शनिवार आणि रविवार, दिनांक २० आणि २१ जुलै २०२४ असे दोन दिवस डॅलस येथे प.पू.सद्‍गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत अतिशय भावपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवासाठी दीड दिवसांच्या भरगच्च कायक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!