
|| श्री ||
देवशयनी आषाढी एकादशी, २०२५
रविवार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी, रात्री ९.०० ते १०.३० या वेळेत ‘श्रीपादनिवास’, पुणे येथे, प्रतिवर्षीप्रमाणे ‘देवशयनी आषाढी एकादशी’ निमित्त आयोजित ‘अभंगगायन’ कार्यक्रम प.पू. सद्गुरु श्री दादा महाराज यांच्या मंगल उपस्थितीत अत्यंत भक्तिभावपूर्वक संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात “सुंदर ते ध्यान” या भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या अभंगाने करण्यात आली. त्यानंतर “महायोग पीठे” हे श्रीविठ्ठलांचे स्तुतीपर स्तोत्र सादर करण्यात आले. यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत मीराबाई इत्यादी संतांच्या विविध भक्तिरसपूर्ण, भगवंताच्या गुणवर्णनाने परिपूर्ण अभंगांचे गायन पुढील क्रमाने करण्यात आले:
- काय नव्हे केले
- केशवा माधवा
- मृत्युलोकी एक नगर
- वासुदेव स्मरण
- झळकती पताका
- अखंड जया तुझी प्रीती
- चलो मन गंगा जमुना तीर
- माझ्या वडिलांची मिराशी
- सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
- चित्ती तुझे पाय
- अवघे जेणे पाप नाशे
- नाम संकीर्तन
- सर्व सुखाची लहरी
- चला आळंदीला जाऊ
- देवाचिये द्वारी
- सुखालागी करीशी तळमळ
- कैसी समचरणींची शोभा
- विठ्ठला पांडुरंगा
सर्व साधकजन या अभंग गायनात समरस होऊन भक्तिरसात न्हाऊन निघाले. कार्यक्रमादरम्यान “जय जय राम कृष्ण हरि”, “विठोबा रखुमाई”, “जय जय विठ्ठल” अशा गजरांनी वातावरण भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण झाले.
कार्यक्रमाची सांगता आरती, मंत्रपुष्पांजली, परंपरा-स्मरण व तीर्थप्रसादाने करण्यात आली.
संक्षिप्त चलतचित्र
