|| श्री ||

श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीकृष्ण व सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या एकत्रित जयंती महोत्सवाचा वृत्तांत


दरवर्षीप्रमाणे ‘श्रीपाद सेवा मंडळा’चा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीचा आणि गोपाळकाल्याचा महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथील ‘प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी, श्रावण कृष्ण ८ व ९ श्रीशके १९४८ म्हणजेच शुक्रवार व शनिवार, दिनांक ४ व ५ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस प.पू.सद्‌‌गुरु श्री. शिरीषदादा व प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत अतिशय भक्तिभावाने, उत्साहाने आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र


उत्सवातील काही क्षण चित्रे

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!