|| श्री ||

‘स्मरणयात्रा’ ग्रंथाची ‘अर्पणपत्रिका’ मोठी सुंदर आहे. तेथे प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादा असे म्हणतात की;
नमो सद्‌गुरो ज्ञान-स्वानंदराशी
नमो आत्मलिंगा इये देहकाशी ।
जया वंदिता मुक्ती पायांसी लोळे
स्वये हर्षुनी भक्ति-उत्साह मेळे ।।

श्रीव्यासपौर्णिमेचा महोत्सव का साजरा करावा? हेही प.पू.सद्‌गुरु श्री. दादांनी वेळोवेळी विस्ताराने सांगितले आहेच. ‘हरिनामसंकीर्तन; प्रक्रिया आणि सामर्थ्य’, या ग्रंथाच्या पृ.क्र.१०३ वर प.पू.श्री.दादा असे म्हणतात की, ‘‘श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा साधनेला बसतो, त्या वेळेस प्रत्यक्ष सद्‌गुरु-परंपराच आपले साधन बघत असते. त्या दिवशी वर्षभरात साधकाने काय केले ते जोखले जाते आणि त्याला साधनापथावर पुढे कसे न्यायचे तेही ठरवले जाते. म्हणूनच वर्षभर नियमाने साधना करणे आणि त्या साधनेची परीक्षा श्रीगुरुपौर्णिमेला देणे हे साधकाचे कर्तव्य असते. त्या अनुषंगानेही श्रीगुरुपौर्णिमेचा, श्रीव्यासपौर्णिमेचा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा असतो !’’

‘अभ्यासयोगा’तील मर्मस्थळे; खण्ड २’, या ग्रंथातील पृ.क्र.६० वर प.पू.श्री.दादा म्हणतात की, ‘‘या महोत्सवानिमित्त आपण साधनेचे स्मरण तसेच सद्‌गुरुपरंपरेच्या प्रेमबोधाचे अनुसरण करण्यासाठीच एकत्र जमलेलो असतो !’’

त्यामुळे या मंगलदिनी प.पू.सद्‌गुरु श्री.दादांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘श्रीसद्‌गुरूंच्या कृपेने आमचे साधन सुफल संपूर्ण होवो. आमची मती आणि कृती अखंड साधनेचीच राहो. आमच्या हृदयामध्ये आपल्या श्रीचरणांबद्दल वाढते प्रेम राहो आणि ते नित्य सुमंगल-पडिभराला येवो !’’ (‘अभ्यासयोगा’तील मर्मस्थळे; भाग २, पृ.क्र.६०) अशी प्रार्थना करण्यासाठीच विविध केंद्रांच्या उत्सवांना सर्व साधक एकत्र जमले होते.

संक्षिप्त चलतचित्र

महोत्सव स्थळ


या वर्षीचा अमेरिकेतील श्रीगुरुपौर्णिमा-महोत्सव शनिवार व रविवार दिनांक १२ व १३ जुलै २०२५ असे दोन दिवस प.पू.सद्‌गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत डॅलस येथे सौ.आसावरी आणि श्री.श्रीहरी साठये यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. या महोत्सवासाठी अमेरिकेतील विविध शहरांमधून तसेच युरोपमधूनही आलेली साधकमंडळी उपस्थित होती.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!